जिल्हाधक्ष्य श्री हरिशभैय्या शर्मा व श्री. अतुल देशकर यांच्या हातून त्यांना पुष्पगुछ देऊन बीजेपी पक्षात समाविष्ट कऱण्यात आले
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव मधील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत हेडाऊ तसेच राष्टवादी काँग्रेस चे पियुष चंदू जैस्वाल यांचे बीजेपी पक्षात आगमन.
श्रीकांत हेडाऊ हे अगोदरच 2006 पासून पक्षाचे कार्यकर्ते व भाजपाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र या 2 वर्षा अगोदर पक्षांतर्गत काही मतभेद झाले त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केले होते. परंतु आता त्यांचे पुन्हा भाजपात पुनरागमन झालेले आहे.येत्या काही दिवसात निवडणुकीला सुरुवात होत असल्यामुळे या दोंघाच्या फायदा bjp ला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे.





