HSRP नंबर प्लेटच्या ‘सेफ्टी कव्हर’च्या नावाखाली पद्धतशीर लूट?
अखेरीस वाहन विभाग झोपेच्या सोंगेत
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही: महाराष्ट्र राज्य सरकारने चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी HSRP (High-Security Registration Plate) नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. ही प्लेट ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने मागवता येते ,
आणि शासनाने नेमलेला केंद्रावर ती निःशुल्क रित्या लावले जाते,
सिंदेवाही तालुक्यात यासाठी
नियुक्त केलेल्या अधिकृत केंद्रावर ती विनामूल्य सुद्धा लावून दिली जाते. मात्र, या प्रक्रियेत ‘सेफ्टी कव्हर’च्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची पद्धतशीर आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
नवीन गाडीचे नम्बर प्लेट तुटली असल्यास नवीन नम्बर प्लेट बनवायची असल्यास त्याला डबल पैसे देऊन बनवून दिल्या जात असल्याने लोकांचे डबल पैसे मोजून द्यावे लागतो आहे. आणि तेच शोरूम मध्ये लावून मागितली तर अर्ध्या किमतीत बनवून दिल्या जाते
मुख्य मुद्दा: ‘सेफ्टी कव्हर’ची सक्ती आणि दरवाढ
HSRP प्लेट्सच्या सुरक्षेसाठी एक ‘सेफ्टी कव्हर’ लावले जाते. हे कव्हर लावणे पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि ज्या ग्राहकांना गरज असेल त्यांनी ते लावावे, अशी अपेक्षा आहे. परंतु, तालुक्यातील केंद्रावर या नियमांचे सरळ उल्लंघन केले जात आहे.
लुटमारीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे
बाहेरून आणलेले सेफ्टी कव्हर लावून देण्यास मनाई
ग्राहकांनी जर स्वतः बाजारातून विकत आणलेले ‘सेफ्टी कव्हर’ लावून देण्याची मागणी केली, तर ते लावण्यास केंद्रावरील कर्मचारी स्पष्टपणे नकार देत आहेत.
सेंटरमधून घेणे बंधनकारक
‘सेफ्टी कव्हर’ लावायचे असेल, तर ते त्याच केंद्रातून घेणे बंधनकारक केले जात आहे. बाहेरून आणलेले कव्हर लावून देण्यासाठी ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे.
पद्धतशीर लूट
अशा प्रकारे, ज्या ग्राहकांना ‘सेफ्टी कव्हर’ लावायचे आहे, त्यांना ते केंद्रातूनच विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे HSRP प्लेट लावून देण्याच्या विनामूल्य सेवेला या ‘सेफ्टी कव्हर’च्या नावाखाली पद्धतशीरपणे शुल्क आकारले जात आहे. हे ‘HSRP नंबर प्लेटच्या सेफ्टी प्लेटच्या नावाखाली केलेली पद्धतशीर लूटमार होत असल्याची नागरिकां मध्ये चर्चा
आहे.
तक्रार निवारण प्रणालीवर प्रश्नचिन्ह
या गैरप्रकाराबद्दल तक्रार करायची झाल्यास नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास, समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. तक्रार निवारणासाठी बसवलेले प्रतिनिधी म्हणजेच ‘बुजगावणे’ असून, त्यांच्याशी बोलल्यानंतर तक्रार करणे किती चुकीचे आहे याचा अनुभव येतो, अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
यंत्रणेवर गंभीर आरोप
HSRP नंबर प्लेट बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया वरिष्ठ स्तरापासून ते नेमलेल्या एजंटपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठीच ठेवली आहे की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे सामान्य नागरिक रोजच्या धावपळीत अशा छोट्या लुटीबद्दल आवाज उचलणार नाहीत, याचा फायदा घेऊन ही ‘लूटमार’ बिनबोभाटपणे सुरू आहे. प्रशासनाने तातडीने या गैरप्रकाराची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांची होणारी ही आर्थिक लूट थांबवेल का ? की या लूटमारीत अप्रत्यक्षपणाने प्रशासन देखील सामील आहे.सर्व सामान्य नागरिकांची गळाचेपी नेहमी होत आहे,त्यामुळे हा मुद्दा देखील काही दिवसांनी पूर्ण पने दबून जाईल, यात अजिबात दुमत नाही.ऑनलाइन करताना सुद्धा मनमानी पणाने शुल्क आकारले जाते आणि हा भूदंड एका व्यक्तीला सर्वसाधारण हजार ते बाराशे रुपये पर्यंत किंवा फोर व्हीलर साठी पंधराशे सोळाशे पर्यंत जाते






