ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार श्री विजयभाऊ वड्डेटीवार यांनी घेतला पुढाकार
नगरसेवक पंकज नन्नेवार यांनी केले नेतृत्व
सिंदेवाही : (दिनांक – १२ ऑक्टोबर २०२५) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे मालधक्का प्रकल्पाविरोधात नागरिकांनी जोरदार विरोध नोंदविला. बाहेरून आयर्न ओवर्स आणून ते येथे डम्प करून रेल्वेमध्ये भरण्याच्या योजनेंवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रकल्प नगराच्या मध्यभागी असल्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढेल, प्रदूषण व अपघातांची शक्यता प्रचंड वाढेल. या कारणास्तव नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याआधी शेकडो नागरिकांनी तहसीलदार संदीप पानमंद यांच्याकडे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिले होते. मात्र, १२ ऑक्टोबर रोजी काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा नागरिकांनी प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरून प्रकल्पाविरोधात जोरदार प्रदर्शन केले.यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. विविध संघटना आणि नागरिकांनी “मालधक्का रद्द करा”, “जीवाशी खेळ नको” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. नागरिकांनी प्रकल्पावर तत्काळ स्थगिती न लावल्यास विरोध आणखी उग्र होईल असा इशारा दिला.या आंदोलनात यावेडी पंकज नन्नेवार , स्वप्निल कावडे, राजू शेख, रवी सावकुडे, अभिजित मुपिडवार, शेरा वनकर,नोमान पटेल, सचिन सहारे, रवी दिघोरे आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे नागरिकांच्या एकत्रित संकल्पनेने हा विरोध अधिक प्रभावी झाला आहे.अशा प्रकारे सिंदेवाहीत नागरिकांनी पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या हितासाठी मोठा ऐक्यबद्ध संघर्ष केला आहे आणि प्रकल्प रद्दीसाठी सरकारवर प्रभाव टाकला आहे.






