पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच त्यांच्या टीमचे चहू बाजूने कौतुक
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316 सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहाळी (नले.) येथे दिनांक 18 सप्टेंबर 2025 ला दारू विक्रेता राजू आनंदराव सिडाम राहणार मोहाळी (नले.) वय 39 वर्ष याचा खून झाला होता. सविस्तर वृत्त असे की, महेंद्र भोजराज पारधी वय 26 वर्ष राहणार कलपाथरी जिल्हा गोंदिया हा वास्तवात मुक्कामी त्याची सासुरवाडी मोहाळी (नले.) येथे राहात होता. दिनांक 18 सप्टेंबर 2025 च्या चार-पाच दिवसापूर्वी महेंद्र पारधी व त्याचा मित्र सुरेश सोनवाणे राहणार मोहाळी (नले.) हे दोघेही गावात स्थापन असलेल्या गणपतीची वर्गणी मागण्यास मृतक राजू आनंदराव सिडाम याचे घरी गेले असता राजुने महेंद्र यास अश्लील शिवीगाळ केल्याने त्याचा राग अनावर झाला. व दिनांक 18 सप्टेंबर 2025 ला महेंद्र भोजराज पारधी याने कट रचून मयुर रामदास वाघमारे (वय 24 वर्ष) राहणार मोहाळी (नले) याची साथ घेतली आणि हे दोघेही मृतक राजू आनंदराव सिडाम याचे घरी दारू पिण्यास गेले असता राजू सिडाम याने महेंद्र पारधी याने शिवीगाळ केली असता राजू सिडाम याच्या अश्लील शिवीगाळचा महेंद्र यास अतिशय राग व चीड आल्याने महेंद्र याने आपल्या रागाच्या भरात सोबत आणलेल्या चाकूने राजुच्या गळ्यावर वार करून त्याला ठार केले. ही घटना दिनांक 19 सप्टेंबरला उघडकीस आली. त्यानंतर सिंदेवाही पोलिस स्टेशनला कळताच सिंदेवाही पोलिसांनी सदर घटनेचा घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता या दरम्यान संशयित आरोपी रवि उर्फ लाडू सीताराम गर्मळे राहणार मोहाळी (नले.) वय 31 वर्ष याला तेथे आपल्या ताब्यात घेतले व पुढे त्यावरून मुख्य आरोपीचा शोध घेण्यात आला. सदर तपास दरम्यान सिंदेवाही पोलिसांनी महेंद्र भोजराज पारधी याला दिनांक 4 ऑक्टोबर 2025 ला त्याच्या राहते गावी कळपाथळी येथे पकडुन आपल्या ताब्यात घेतले तर मयुर रामदास वाघमारे याला मोहाळी (नले.) येथे पकडण्यात आले. सदर कारवाही चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात व सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस अधीक्षक सतीश मेश्राम, दर्शन लाटकर, संजय जुमनाके, आफताब शेख, नारायण येगेवार, दादाजी रामटेके, मधुकर आत्राम, सुनिल डोंगरे यांनी केली. सिंदेवाही पोलिसांनी पोलिस स्टेशन सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात केलेल्या यशस्वी कामगिरी बद्धल त्यांचे नागरिक व पत्रकार बंधुंतर्फे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.






