’पैसे देऊन माणसे गोळा केली‘ – ग्रामस्थांचे सरपंचांवर गंभीर आरोप*; लोकशाहीची पायमल्ली?
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
वासेरा, सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील वासेरा ग्रामपंचायतीने नवीन देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र (NOC) दिल्यामुळे गावात तीव्र असंतोष आणि खळबळ उडाली आहे. सरपंच दिलीप मेश्राम आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घेतलेली ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जागरूक नागरिकांचा आरोप आहे की, ही ग्रामसभा गुप्तपणे आणि पुरेसा प्रचार न करता घेण्यात आली, इतकेच नाही तर पैशांचा वापर करून मजुरांना बोलावून ठराव मंजूर करून घेण्यात आला.
- जागरूक ग्रामस्थांच्या प्रश्नांचा आणि आरोपांचा हल्लाबोल*!
ग्रामस्थांनी थेट सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आणि थेट प्रश्न उपस्थित केले आहेत, जे लोकशाही प्रक्रियेवर आणि पदाधिकाऱ्यांच्या हेतूवर शंका निर्माण करत आहेत
नोटीसमध्ये अस्पष्टता: नोटीस बोर्डावर ‘C L π’ असा अस्पष्ट उल्लेख का होता? ‘देशी दारू दुकानाला परवानगी’ असे स्पष्टपणे का लिहिले नाही? लोकांना पुरेशी माहिती देणे टाळले गेले का?
कागदपत्रांची अपूर्णता: देशी दारू दुकानाच्या आवश्यक कागदपत्रांची पाहणी न करता किंवा ग्रामसभेत ती माहिती न देता घाईगडबडीत ठराव का मंजूर करण्यात आला?
,आवाज दाबण्याचा प्रयत्न
“ग्रामसभेत ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे. हा प्रयत्न ‘चिरीमिरी’ (लाच) घेऊन स्वतःचा फायदा करण्यासाठी केला गेला काय?
पैशांचा व्यवहार आणि ‘धुरे खोद्या ची चर्चाधुरे खोद्या चे गावाला लागले ग्रहण ?
गावात चर्चा आहे की, सर्व पदाधिकारी आणि गावातील काही ‘धुरे खोद्या यांनी परवाना धारकाकडून ‘चिरीमिरी’ घेतली आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास, तुमची नैतिकता आणि पद कितपत योग्य आहे?
MREGS मजुरांचा वापर
- लोकशाहीला धोका: सर्वात गंभीर बाब म्हणजे, ज्या दिवशी ग्रामसभा होती, त्याच दिवशी MREGS (मनरेगा) च्या कामावरून जवळपास १७२ मजूर आणले गेले आणि प्रत्येक व्यक्तीला रोजगार सेवकाच्या माध्यमातून ५०० रुपये रोख देऊन ठराव मंजूर करून घेण्यात आला! नागरिकांचा दावा आहे की, त्यांच्याकडे या गैरव्यवहाराचा ठोस पुरावा आहे. ‘विकास नव्हे, विकार करताय!
‘ – सरपंच पदाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह
वासेरा येथील जागरूक नागरिकांनी सरपंचांच्या कार्यक्षमतेवर आणि हेतूवर थेट हल्ला चढवला आहे:
सरपंचांच्या अज्ञानाची किळस: “सरपंच, तुम्हांला या पाच वर्षांत १०% ग्रामपंचायत समजली का? याचे उत्तर द्या!” असा कठोर सवाल उपस्थित करत त्यांच्या प्रशासकीय ज्ञानावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
’विकार’ करण्याचे आरोप: “सरपंच, तुम्ही ‘धुरे खोद्या’ यांना हाताशी धरून गावाचा विकास न करता ‘विकार’ (नाश/बिघाड) करत आहात. तुमचं त्या खुर्चीवर बसण्याचा काहीच अधिकार नाही!”
ग्रामपंचायतीच्या निर्मितीचा अर्थ काय?: “शासनाने ग्रामपंचायतीची निर्मिती कशासाठी केली आहे?” असा मूलभूत प्रश्न विचारून, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीचे उल्लंघन केल्याचे ठणकावले आहे.महिला वर्गाचा एल्गार एका बाजूला, तर सरपंच दारूला परवानगी देतात!
एका बाजूला राज्यभर महिला वर्ग दारूबंदीसाठी ‘एल्गार’ पुकारत असताना, वासेरा गावात मात्र चक्क गावचे सरपंच आणि सदस्य खुलेआम दारू दुकान खोलण्यास परवानगी देत आहेत. हा विरोधाभास सामान्य नागरिकांच्या मनात तीव्र संशय निर्माण करत आहे.
जागरूक नागरिकांची शासनाकडे मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी आणि आणखी एक ग्रामसभा घेऊन परवानगीबद्दल फेरचर्चा करावी.
हा प्रकार लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारा आणि पैशांच्या जोरावर गावच्या शांततेला आणि विकासाला विकणारा असेल तर प्रशासन यावर कोणती कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






