चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात भरती असून प्रकृती धोक्याच्या बाहेर
अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथील सौ मयुरी अजय आनंदे वय अंदाजे 26 ही रात्री बारा वाजता घरी झोपलेली असताना. अचानक गोवर्धन पुजेच्या दिवशी मन्यार जातीच्या विषारी सापाने तीच्या पायाला चावा घेतला.जेव्हा तिला माहिती झाले तेव्हा लगेच सिंदेवाहीच्या सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.मात्र प्रकृती ढासळत असल्याने तिथून तिला उपचार करण्याकरिता चंद्रपुर मधील शासकीय रुग्णालयात भरती केले. प्रकृती सध्या स्थिर असून योग्य वेळी उपचार मिळाल्याने जीवितास कोणतीही हानी झालेली नाही.






