एका पाठोपाठ एक गुन्हेगारास वेठीवर आणणारे शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांचे नाव सगडीकडे चर्चेत
सुरज बहुरिया हत्त्याकांड चा बदला घेण्यासाठी आलेल्या बल्लारपूरातील बहुरिया समर्थकांना चंद्रपूर येथील स्थानिक गंज वार्ड परिसरातुन हत्यारासह अटक
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 976427131
बल्लारपूर शहरात सन 2020 ला झालेली सुरज बहुरिया याची हत्त्या आणि त्या हत्तेचा बदला घेण्यासाठी बहुरिया समर्थक गैग कडून आकाश अंधेवार याचेवर 2021 तर अमन अंधेवार याचेवर 2024 ला झालेले गोळीबार ह्या अंत्यत घातक घडामोडी असून आता त्याचं अंधेवार बंधुपैकी एकाला ठार करण्यासाठी चंद्रपूर शहरात मोठा शस्त्रसाठा सुरज बहुरिया समर्थक यांनी गंज वार्ड परिसरात ठेवला होता, मात्र शहर पोलीस स्टेशनं चे डिबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखे चे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या चमुने गुप्त माहितीद्वारे अंधेवार बंधुवर होणारा प्राणघातक हल्ला उधळला असून पोलिसांनी खुनी हल्ल्यासाठी शस्त्र बाळगाणाऱ्या चार आरोपीना अटक केली आहे, त्यात शनिवारी रात्री गंजवॉर्ड येथे केलेल्या या कारवाईत चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरीस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा ऊर्फ टंक्यू, अमित बाडकुराम सोनकर सर्व रा. बल्लारपूर अशी आरोपीची नावे आहेत, या आरोपीकडून पोलिसांनी दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात ८ ऑगस्ट २०२० रोजी दारू व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर येथे सूरज बहुरिया याची दोन जणांनी गोळ्या झाडून भर चौकात हत्या केली होती. या हत्याकांडामध्ये अमन अंदेवर व आकाश अंदेवार या सख्ख्या भावांना त्यावेळी आरोपी म्हणून अटक करण्यात आली, सुरज बहुरिया हत्त्याकांडानंतर आकाश अंधेवार व अमन अंधेवार यांना अटक करून चंद्रपूर च्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते, पण सुरज बहुरिया समर्थक हें या दोन भावांना संपविण्यासाठी प्लॅन आखत होते, दरम्यान आकाश अंधेवार यांची तीन महिन्यानंतर कारागृहातून सुटका करण्यात आली, त्याच्या मार्गांवर सुरज बहुरिया समर्थक होते, मात्र आकाश अंधेवार हें सहज सापडणार नाही म्हणून अंत्यत दिमाग लावून हनी ट्रॅप द्वारे त्यांना रघुवंशी कॉम्प्लेंक्स जवळ बोलावले अन मुलीच्या वैशात बुरखाधारी व्यक्तीने आकाश अंधेवार यांच्यावर गोळीबार केला त्यात तीन गोळ्या आकाशला लागल्या दोन पाठीवर तर एक हाताला लागली होती.






