श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
शहरातील मुख्य वर्दळीचा सिंदेवाही–नवरगाव मार्ग हा आरमोरी ते पुलगावला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग असला तरी, रस्त्याची अवस्था अद्यापही अडचणीचीच आहे. या मार्गाचा दोन पदरी (डबल लेन) विस्तार केव्हा होणार, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही शहरातून चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या दिशेने वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र नवरगावकडे जाणारा हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद व खडबडीत असल्याने वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाची केवळ डागडुजी करण्यात येते; मात्र मूळ रस्त्याचा विस्तार अद्यापही रखडलेलाच आहे.
आरमोरी–पुलगाव हा राज्यातील महत्त्वाचा जोडमार्ग असल्याने सिंदेवाही ते नवरगावपर्यंतचा भाग दोन पदरी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. नागरिकांचे एकच प्रश्न — “हा महामार्ग नेमका केव्हा दोन पदरी होणार?”
चारचाकी, बस, ट्रक यासारखी जड वाहने या मार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळते. डांबर रस्त्याच्या दोन्ही कडेला जागेचा अभाव, अतिक्रमणाचा विळखा आणि वर्दळीची गर्दी यामुळे प्रवास अधिकच कठीण झाला आहे.






