दर वर्षी या गणेश मंडळाच्या वतीने उत्कृष्ट् सामाजिक उपक्रम राबिवले जातात
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
सिंदेवाही मधील लोणवाही या गावातील बाल विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी स्तुत्य उपक्रम राबविले जातात. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, वृक्षरोपण मोहीम, गोरगरीब लोकांना आर्थिक मदत तसेच या वर्षी या मंडळाला नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी छत्रपती शिवाजी महाराज बेघर आश्रम या बद्दल माहिती मिळाली तसेच या आश्रम मध्ये जे बेवारस लोक असतात ज्यांना घरे नाही भटकंती करीत असतात व कोणतेही फेकलेले अन्न खाऊन कुठेही राहतात अश्या लोकांना निवारा देण्याचे काम या आश्रमामध्ये मोफत मध्ये केले जातात.
त्यामुळे अशा आश्रमाची माहिती मिळताच लोणवाही येतील बाल गणेश गणपती मंडळ यांनी जी वर्गणी गोळा केली होती त्यापैकी एक स्तुत्य उपक्रम म्हणून त्यांनी या निवारा आश्रम ला अनाज तसेच कडधान्य व काही आर्थिक मदत देऊन एक गणपती मंडळाला मोलाचा संदेश दिला.
अनेक गणपती मंडळ केवळ लाखो रुपये गोळा करून पैसेची केवळ dj तसेच अवाजवी खर्च करीत असतात मात्र लोणवाहीच्या मंडळाने यावर्षी या आश्रमला मदत करून एक जनजागृती करण्याचे काम केले तसेच त्या आश्रमाच्या लोकांना सुद्धा एक मोलाची मदत मिळाली त्यामुळे आश्रम चालवणारे संस्थापक परमेश्वर मडावी यांनी बाल गणेश विघ्णहर्ता गणपती मंडळ लोणवाही यांचे आभार मानले असेच निवारगृहाला बाकींच्या मंडळांनी सुद्धा छोटीशी भेट वस्तू देऊन आसरा द्यावे अशी विनंती केली.







