डि जे’ वाजकाची वाढली धाकधूक
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथे झाली कार्रवाही
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावा गावात गणपती स्थापना केली जाते. ज्यात अनेक घरघुती तसेच सार्वजनिक गणपती बसवल्या जातात.
अश्यातच सार्वजनिक गणपती बसलवलेले मंडळ मोज मस्ती करण्याकरिता तसेच गणपती बापाचे विसर्जन करण्याकरिता मोठ्या रोषात पैसे जमा करून डि जे बुक करतात व ते विसर्जन ज्या दिवशी असते त्या दिवशीच्या मिरवणुकीत वाजवीत असतात. मात्र या वर विरजण पडलेला आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कारण पोलीस प्रशाशनाने जास्त डेजिबल असलेल्या डिजे ला बंदी केली असल्याने आता जे मजा अगोदर डीजे मध्ये येत होती ती राहलेली नाही. तसेच जर आवाज आता वाढविल्यास थेट डिजे चालकावरती फौजदारी कार्रवाही केली जात असल्याने चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अश्यातच आज सिंदेवाही जवळील पवनपार या गावी वाजत असलेल्या डिजे वरती सिंदेवाही पोलिसांनी जप्तीची कार्रवाही केली तसेच dj माल व गाडी सहित एकूण 15,35000(पंधरा लाख पस्तीस हजारचा )माल जप्त केला. तसेच नवयुवक बाल गणेश मंडळ यांचा कार्यकारणीवरती कार्रवाही केली. त्यामुळे आता गणपती मंडळाचे तसेच dj चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
हि कार्रवाही सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस उप- निरीक्षक श्री श्रीकांत लांजेवार, अंमलदार संजय जुमनाके, नारायण येरगेवार तसेच त्यांची टीम ने केली.





