दो दिन कि चांदणी, फिर अंधेरी रात
महिलांना बस मध्ये प्रवास करताना स्मार्ट कार्ड बंधनकारक अन्यथा फुल्ल तिकीट
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
महाराष्ट्र सरकारने निवडून यायचा अगोदर महिलांना लाडकी बहिणीचा दर्जा देऊन त्यांना लाडकी बहीण योजना सुरु करून 1500 रु महिना सुरु केले. त्यानंतर सरकारी बस मध्यें महाराष्ट्र शासनाने महिलांना सरसकट अर्धी तिकीट लागू केली.त्यामुळे सर्व महिला खुश होऊन सरकारचे आभार मानायला लागले.
मात्र अचानक शासणाने आपले पाहुल बदलवून चुकीच्या मार्ग अवलंबिले आणी सर्व महिला मंडळीना हिरमुस करण्याचे काम सुरु केले आहे व लुटमार सुरु केली आहे.
सर्व महिला तसेच वयोवृद्ध लोकांना आता स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक केल्याने अनेक महिलांमध्ये नाराजीचे सूर पसरू लागलेले आहे. प्रत्येक महिलांना आता बस मध्ये प्रवास करायचे असल्यास स्मार्ट कार्ड सोबत बाळगायचे आहे सोबतच त्या मध्ये रिचार्ज म्हणजे पैसे मारायचे आहे. अन्यथा त्या महिलेकडून फुल्ल तिकीट घेतली जात आहे. त्यामुळे समस्त महिलाना स्मार्ट कार्ड काढायला लावले असल्याने आता हा स्मार्ट कशासाठी? नेमकी सरकार दिशाभूल तर करीत नाही नं?. परवडत नसेल तर कशाला योजना राबवीत असतात असे प्रश्न आता महिला मंडळीच्या मनात पडत असल्याने प्रत्येक गावात एकच चर्चला उधाण आलेला आहे. कारण आता सर्व वयोवृद्ध वेक्ती तसेच सर्व 12 वर्षच्या वरती असलेल्या महिलांना स्मार्टकार्ड काढणे बंधनकारक केले आहे व
स्मार्ट कार्ड काढायला ३०० रु.आणी त्या कार्डला रिचार्ज करायला ५०० रु असे पैसे लागत असल्याने सरसकट महिलाना अर्धी तिकीट योजनांचा काय उपयोग हि योजना सरकारनी महिलाना फसवासाठी किंवा केवळ मत घेऊन निवडून यासाठी तर नाही केली असेल न असे तर्क आता महिलांच्या मनात पडत आहे. या योजनेचा महिलांना फायदा होत नसेल तर समोर नक्कीच त्यांचा भुरदंड सरकारला भोगायला मिळेल असे सुद्धा काही महिलांच्या मुखातून एक्काला मिळत आहे..सरकारनी यावर चर्चा करून योग्य निर्णय घ्यावे असे सर्व महिलांची मागणी आहे.






