सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष्य अमोल निनावे यांनी आपल्या मनातील विचार केले प्रकट
गोरगरीब, होतकरू, अनाथ आश्रम अपंग, वृद्ध आश्रम,भटकंत्या लोकांना आश्रय देणाऱ्या आश्रम,गरीब मुलाला शिक्षणाकरिता मदत करूया
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गणपतीच्या मंडळांनी एक विचार करायला पाहिजे, आपण लाखो रुपये वर्गणी गोळा करून तसेच स्वतःचे पैसे काढुन आठ दिवसात जेवढे पैसे पूजा किंवा आठ दिवस घेत असलेल्या कार्यक्रमासाठी कुवा उपक्रमासाठी लावत नाही तेवढे पैसे आपण केवळ आणि केवळ dj साठी लावत असतो. आणि एकदिवसाचा फक्त क्षणिक सुख उपभोगत असतो. मात्र त्यात किती लोकांचा फायदा होतो किंवा नुकसान होतो याचा कधी मंडळाच्या सदश्य किंवा पदाधिकारी यांनी विचार केला का?
जर हेच लाखो रुपये आपण जर एकाद्या अनाथ आश्रमला, वृद्राश्रमला, किंवा जे युवा मुले भटकंत्या लोकांना निवारगृह तयार करून त्यांची सेवा करतात अश्या लोकांना जर फक्त तुमच्या परीने प्रत्येक मंडळा कडून मदत मिळाली तर आज ते लोक तुमच्या पैसेमुळे आणखी लोकांची सेवा करतील आणि त्यात तुम्हचे मोलाचे योगदान राहतील त्यामुळे आपण सर्व मिळून सर्व सण समारंभ खुशीने मनवू मात्र त्याच सोबत सामाजिक उपक्रमात पण भाग घेऊन हातभार लावू असे मला वाटते.
आणि गणपती, शारदा, दुर्गा उत्सव मध्ये सामाजिक उपक्रमाबद्दलचे कार्यक्रम आयोजित करून समाजातील अनिष्ट रूढी परंपराचा नाहींनाट करण्यास मदत करूया. त्यामुळे समाजात जागृती निर्माण होऊन एक आदर्श निर्माण होणार व गर्व निर्माण होणार.
(माझ्या मनातले फक्त विचार मी सर्वांच्या समोर प्रकट केले बाकी……)
(या पोस्ट वरून कुणाला वाटत असेल कि मी dj लाविरोध करून हे पोस्ट केली असेल तर मुळीच विरोध नाही)
आपलाच :-
अमोल से निनावे सामाजिक युवा ब्रिगेड संस्था अध्यक्ष्य, संपाद्क, पत्रकार, अमूल्य ट्यूशन क्लासेस शिक्षक व पोलीस मित्र






