केवळ थंड पाणी करून विकल्या जातो आरोच्या खाजगी फिल्टरचा पाणी
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 976427136
सिंदेवाही:- आरो प्लांट व्यावसायिकांना केंद्रीय भूजल मंडळ, अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतरच त्यांच्या आरओ प्लांटला रितसर परवानगी मिळू शकते. जिल्ह्यातील अनेक आरओ प्लांट व्यावसायिकांनी नियमांना बगल देत आपले वेवसाय थाटामाटात सुरु केले आहे.
मात्र सुरुवातीला पाणी हा फिल्टर करून तसेच वॉटर कॅन स्वछ धुवून द्यायचे व त्या पाण्याची टेस्ट हि टेडीयस नुसार असायची. मात्र आता अनेक वेवसायीकांनी केवळ पाणी हें थंड करून कॅन मध्ये भरले कि डायरेक्ट विक्री करीत असल्याने अनेक लोकांना आरोग्याचे त्रास होताना आढळत आहे.
सण समारंभामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आता आरो चेच पाणी वापरत असल्यामुळे जिकडे तिकडे फिल्टरचे वेवसाय मोठ्या प्रमाणात झालेले आहे.मागणी मार्केट मध्ये जास्त असल्याने ज्या कॅन मध्ये पाणी भरून dilya jato ti swach raht nahi. मात्र त्या पाण्याची प्रशासनाकडून एकदा तरी चौकशी होतो का असा प्रश्न लोकांनी उपस्तिथ केला आहे.
प्रशाशनाने दर 6 महिन्याला पाण्याची गुणवत्ता चेक करून ज्या आरो वेवसायाचे पिण्यायोग्य फिल्टर केलेले पाणी नसेल अश्यावरती कार्रवाही करायला पाहिजे अशी मागणी लोकांकडून होत आहे.
“लोकांच्या आरोग्यासोबत खेळणे बन्द केव्हा होणार आणि प्रशाशनाला केव्हा जाग येणार” याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे.






